Rajya Sabha Election 2024 | राज्यसभा निवडणूक होणार बिनविरोध; अपक्षाचा अर्ज झाला बाद | Navarashtra (नवराष्ट्र)

0
85
Rajya Sabha Election 2024 | राज्यसभा निवडणूक होणार बिनविरोध; अपक्षाचा अर्ज झाला बाद | Navarashtra (नवराष्ट्र)


राज्यसभा निवडणूक होणार बिनविरोध; अपक्षाचा अर्ज झाला बाद

भाजप (BJP), शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. याशिवाय, एक अपक्ष अतिरिक्त अर्ज आलेला होता. मात्र आता हा अर्ज फेटाळण्यात आलेला असून यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

नवी दिल्ली : येत्या काही दिवसांत राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election 2024) होत आहे. त्या दृष्टीने सर्वच पक्षांकडून उमेदवार दिले गेले आहेत. भाजप (BJP), शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)अजित पवार गट आणि काँग्रेस (Congress) पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. याशिवाय, एक अपक्ष  अतिरिक्त अर्ज आलेला होता. मात्र आता हा अर्ज फेटाळण्यात आलेला असून यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांनी तर काँग्रेस पक्षाने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी अर्ज भरला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे.






Source link