Rajya Sabha 2024 | राज्यसभेत भाजपसह एनडीए झाला ‘शक्तिशाली’; बहुमतापासून फक्त चार खासदार दूर, आता… | Navarashtra (नवराष्ट्र)

0
35
Rajya Sabha 2024 | राज्यसभेत भाजपसह एनडीए झाला ‘शक्तिशाली’; बहुमतापासून फक्त चार खासदार दूर, आता… | Navarashtra (नवराष्ट्र)


राज्यसभेत भाजपसह एनडीए झाला ‘शक्तिशाली’; बहुमतापासून फक्त चार खासदार दूर, आता…

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha 2024) चमकदार कामगिरी करणारा भाजप आता राज्यसभेत स्वबळावर बहुमताच्या अगदी जवळ आला आहे. एप्रिलमध्ये रिक्त झालेल्या राज्यसभेच्या 56 जागांपैकी भाजपने 30 जागा जिंकल्या आहेत. त्यापैकी 20 बिनविरोध निवडून आले.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha 2024) चमकदार कामगिरी करणारा भाजप आता राज्यसभेत स्वबळावर बहुमताच्या अगदी जवळ आला आहे. एप्रिलमध्ये रिक्त झालेल्या राज्यसभेच्या 56 जागांपैकी भाजपने 30 जागा जिंकल्या आहेत. त्यापैकी 20 बिनविरोध निवडून आले. त्याचवेळी मतदानातून 10 जागा जिंकल्या. त्यामुळे राज्यसभेतील भाजप खासदारांची संख्या 97 होणार आहे.

राज्यसभा खासदारांमध्ये पाच नामनिर्देशित खासदारांचा समावेश आहे. त्याचबरोबर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या खासदारांची संख्या 117 पर्यंत वाढणार आहे. वरिष्ठ सभागृहात 240 खासदार आहेत. बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला 121 खासदारांचा पाठिंबा आवश्यक असतो. एनडीएसोबत ही संख्या 117 वर पोहोचली आहे. बहुमतापासून फक्त 4 दूर आहे.






Source link