
ज्याप्रमाणे राजीव यांचे व्यावसायिक जीवन विस्कळीत झाले होते, त्याचप्रमाणे त्यांचे वैयक्तिक आयुष्यही गडबडले होते. राजीव यांनी २००१मध्ये आर्किटेक्ट आरती सभरवाल यांच्याशी लग्न केले होते. परंतु, त्यांचे लग्न २ वर्षेही टिकू शकले नाही. २००३मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. लग्नापूर्वी राजीवचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. अभिनेत्री दिव्या राणा, अभिनेत्री तृष्णा यांच्यासोबत त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, नंतर ते एकटेच राहिले.








