
रजनीकांत आणि ठाकरे कुटुंबीयांचे संबंध खूप चांगले असल्याचे बोलले जात आहे. जेव्हा रजनीकांत काही कामानिमित्ताने मुंबईत येतात, तेव्हा ते मातोश्रीवर जातात आणि ठाकरे कुटुंबाची भेट घेतात. अभिनेते रजनीकांत हे बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचे मोठे चाहते आहेत, असेही म्हटले जाते. आदित्य ठाकरेंच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, ‘मातोश्रीची ताकद’. तर, आणखी एकाने लिहिले की, ‘सुपर-डुपर.’ दुसऱ्या एकाने ‘मातोश्रीवर थलायवा’ असे लिहिले आहे.