Raj Thackeray In Jalna : गोळीबाराचे आदेश देणाऱ्यांना मराठवाड्यात बंदी घाला; राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

0
17
Raj Thackeray In Jalna : गोळीबाराचे आदेश देणाऱ्यांना मराठवाड्यात बंदी घाला; राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल


आरक्षणाचं आमिष दाखवून सत्ताधारी बदलतात, सत्तेत आल्यानंतर हे लोक तुमच्यावर गोळ्या झाडणार, पोलिसांना दोष देऊ नका, पोलिसांना आदेश कुणी दिलेत, त्यांना दोष द्या. जे आदेश आले त्याचं पालन पोलिसांनी केलं. आरक्षणावर राजकारण करत मतं पदरात पाडून घेतली की तुम्हाला वाऱ्यावर सोडून द्यायचं, असाच खेळ सध्या सुरू असल्याचं राज ठाकरे म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असते तर त्यांनी आज काय केलं असतं?, मी काय आज इथं राजकारण करायला आलेलो नाही, तर मराठा आंदोलकांना विनंती करायला आलोय, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.



Source link