
राहुल गांधी यांनी मंगळवारी राजस्थानमध्ये एका निवडणूक प्रचार सभेला संबोधत करताना म्हटले की, पीएमचा अर्थ आहे पनौती मोदी. क्रिकेट विश्व कप फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा उल्लेख करताना राहुल गांधी यांनी या शब्दाचा वापर केला. सामन्यानंतर सोशल मीडियावर ‘पनौती’ शब्द ट्रेंड करत होता. राहुल गांधी म्हणाले की, मोदी लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवतात वउद्योगपती अदानी जनतेचा खिसा कापतात. त्यांनी म्हटले की, मोदी टिव्हीवर येतात व ‘हिंदू-मुस्लिम’ म्हणातात. कधी-कधी क्रिकेट मॅच बघायला जातात. तो विषय वेगळा आहे की, संघाला हरवले. पनौती.








