
डॉ. बळवंत म्हणाले, ‘या भागात पाळत ठेवणे आणि प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. मनपाने संशयित गर्भवती महिला एनआयव्हीचे ३८ नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. यामध्ये घोले रोड येथील १२, खराडी येथील ९ आणि पाषाण आणि कोथरूड येथील प्रत्येकी ७ नमुन्यांचा समावेश आहे, अशी माहिती पालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली. पुण्यात झिका रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. प्रशासनाकडून संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची तत्काळ चाचणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले.




