
दरम्यान, या पूर्वीचे डिन डॉ. विनायक काळे यांना हटवून डॉ. संजीव ठाकूर यांची ससुनच्या डिनपदी निवड करण्यात आली होती. या विरोधात डॉ. विनायक काळे यांनी मॅटचे दार ठोठावले होते. सर्व प्रकरणाचा तपास करून मॅटने निकाल डॉ. विनायक काळे यांच्या बाजूने दिला होता. तसेच त्यांना ससूनच्या डिन पदावर कायम देखील केले होते. मात्र, या विरोधात डॉ. संजीव ठाकूर हे थेट उच्च न्यायालयात गेले होते. दरम्यान, उच्च न्यायालयाने देखील संजीव ठाकूर यांना दणका दिला आहे. न्यायालयाने मॅटचा निकाल कायम ठेवला आहे. यामुळे संजीव ठाकूर डिन पद सोडावे लागणार आहे. तसेच त्यांच्या जागी डॉ. विनायक काळे यांची वर्णी लागण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.







