
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सहकार परिषदेसाठी पुण्यात शनिवारी रात्री दाखल झले आहे. दरम्यान, त्यांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधला. यानंतर त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील तातडीने बोलावून घेतल्याचे समजते. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शहा यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी मंत्रिमंडळाच्या विस्तारासह आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा संदर्भात चर्चा केली असावी असा अंदाज लावला जात आहे.






