
Pune vadgaon sheri Murder : पुण्यात खून, दरोडेखोरी, चोऱ्या या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. घोरपेडे पेठ येथे एका तरुणाची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतांना आता वडगाव शेरी येथे बुधवारी रात्री एका तरुणाचा सात आठ जणांनी मिळून खून केला. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. खून झालेला तरुण हा देखील सराईत आरोपी असल्याची माहिती आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले असून आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास पथके स्थापन करण्यात आले आहे.





