
Pune FDA Action on toni da dhaba : पुण्यात हॉटेलमध्ये खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. लाखो पुणेकर विविध हॉटेलमध्ये अक्षरशा: रांगा लावून जेवणासाठी थांबत असतात. मात्र, आता हॉटेलमध्ये खण्यापूर्वी त्या हॉटेलमधील पदार्थ हे शुद्ध वस्तूंपासून बनले की नाही हे तपासून पाहवे लागणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत ही बाब उघड झाली आहे. पुण्यातील पाषाण येथील टोनी दा ढाबा यहेतहे कारवाई करत तब्बल ४७ लाख ४७ लाख २२ हजार ३०० रुपयांचा प्रतिबंधित साठा व एक वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.







