
सायबर चोरट्यांनी अनेकांना पैसे मागितल्याचा प्रकार पुढे आला आहे. सायबर चोरट्यांनी अमितेश कुमार यांच्या ओखळीतील व्यक्तीला पाच दे दहा हजार रुपयांची मागणी केली. आरोपीने व्हॉटस्अपला अमितेश कुमार यांचा फोटो ठेवलेला होता. मी अमितेश कुमार असून, विदेशात अडकलो आहे. विमान प्रवासासाठी मला पैसे हवे आहेत, असा मेसेज करून पैशांची मागणी चोरट्यांनी केली.




