
[ad_1]
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कसबा पेठेतल्या सातपोटी चौकात मेट्रोच्या भूयारी मार्गाचं काम सुरू आहे. दुपारी काम संपवून काही कामगार एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले. तिथून सातपोटी चौकात परत येत असताना कामगारांना दोन ते तीन लोकांनी धक्का देत अडवलं. त्यानंतर आरोपींनी कामगारांना शिवीगाळ करत त्यांना एका रिक्षातून पवळे चौकाच्या दिशेने नेलं. त्यानंतर चोरट्यांनी कामगारांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील २० हजार रुपये लुटले. कामगारांनी आरडाओरड करण्यास सुरुवात करताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
[ad_2]
Source link
