
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सोन्या मारुती चौकातील एका सराफी पेढीतील जवळपास सव्वा कोटी रुपयांच्या सोनसाखळ्या, दागिने आणि हार चोरट्यांनी लंपास केले आहे. सराफी पेढीचे मालक जितेंद्र धनराज सोनीग्रा यांनी पुणे पोलिसांत याबाबतची तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी विक्रम अमृतलाल बाफना याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील पेठांच्या भागांमध्ये एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार चोरट्यांनी पळवला होता. परंतु आता सव्वा कोटींच्या आसपास किंमत असलेली दागिने चोरण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.





