Pune crime : खळबळजनक! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

0
22
Pune crime : खळबळजनक! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न


संजय फकिरा साळवे (रा. पिंपरी चिंचवड, मूळगाव- जालना)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने दारूच्या नशेत महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जालन्याच्या प्रयत्न केला. घी घटना पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस ठाण्यासमोर शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास हा प्रकार घडला आहे. पुण्यात सध्या ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणी कारवाई तीव्र करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर देखील या प्रकरणी कारवाई सुरू होती. यावेळी एका वाहनचालकाला अडवण्यात आले असून त्याला कागद पत्र विचारले असता त्याने रागाच्या भरात महिला पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर थेट पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला.



Source link