Pune Car accident case : पोर्शे कारची पाहणी करण्यासाठी जर्मनीचे तंत्रज्ञ पुण्यात येणार! AI च्या मदतीने रहस्य उलगडणार

0
15
Pune Car accident case : पोर्शे कारची पाहणी करण्यासाठी जर्मनीचे तंत्रज्ञ पुण्यात येणार! AI च्या मदतीने  रहस्य उलगडणार


pune porsche car accident : पुण्यात कल्याणीनगर येथे झालेल्या अपघाताबाबत रोज नव नवींन घटना उघडकीस येत आहेत. सध्या आरोपी मुलाची आईची फरार आहे. या प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली असून त्यांचे निलंबन देखील करण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेबाबत बिल्डर विशाल अग्रवाल याच्या वकिलांनी न्यायालयात अपघातग्रस्त पोर्शे कारमध्ये तांत्रिक समस्या असल्याचा दावा केला होता. याची तक्रार कंपनीकडे केल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले आहे. त्यामुळे पुणे पोलिस आता या घटनेचा उलगडा करण्यासाठी एआय तंत्रज्ञाची मदत घेणार आहे. या द्वारे अपघाताची घटना कशी घडली याचे ग्राफिक्स तयार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या साठी कंपनीचे तंत्रज्ञ हे जर्मनीवरून येणार असल्याची माहिती आहे.



Source link