
मिळालेल्या माहितीनुसार बेसनाची पोती वाहतूक करणारा ट्रक साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. ट्रक नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ आला असता, पाठीमागून एका कंटेनरने ट्रकला जोराची धडक दिली. यामुळे ट्रक समोर असणाऱ्या दुसऱ्या एका कंटेनरवर जाऊन आदळला. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रकला आग लागली. यामध्ये ट्रकच्या केबिनमध्ये बसलेल्या तीन प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन जण गंभीररित्या भाजले. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.






