Pune: पुण्यातील धक्कादायक घटना! महिला पोलीस शिपायाची इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या

0
1
Pune: पुण्यातील धक्कादायक घटना! महिला पोलीस शिपायाची इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या


Pune Woman Police Constable Dies By Suicide: पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलने आळंदीतील इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली. ही रविवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. संबंधित महिला कॉन्स्टेबलने पाण्यात उडी घेतल्याचे पाहून तिथे उपस्थित असलेल्या तरुणाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. महिला कॉन्स्टेबलने असे टोकाचे पाऊल का उचलले? याचाही शोध घेतला जात आहे. महिला पोलिसाने असे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



Source link