Pune : धक्कादायक! मृतदेहाची इन्स्टाला स्टोरी ठेवल्याने तरुणाचा खून; ‘दृश्यम’ स्टाईलने पुरावे नष्ट करणारा आरोपी गजाआड

0
20
Pune : धक्कादायक! मृतदेहाची इन्स्टाला स्टोरी ठेवल्याने तरुणाचा खून; ‘दृश्यम’ स्टाईलने पुरावे नष्ट करणारा आरोपी गजाआड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रासे फाटा (ता. खेड) येथे असलेल्या मराठा हॉटेलमध्ये काही दिवसांपूर्वी हॉटेल मालक स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे याच्यावर काही जणांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात स्वप्नील शिंदे गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी तपास करत असतांना पोलिसांनी सुरुवातीला अजय गायकवाड याला अटक केली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अनोळखी आरोपीची ओळख पटवून अमर नामदेव शिंदे (वय २५, रा. कासार आंबोली, ता. मुळशी) याला अटक केली.

Source link