फलटण : परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचा विटंबना केल्याची घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलनाची लाट उसळली. या प्रकरणात पोलीस विभागाने कोंबिंग ऑपरेशन राबवले, ज्यात वडार समाजाचे पँथर नेते सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांनाही अटक करण्यात आली. मात्र, पोलीस कोठडीत असताना झालेल्या जबर मारहाणीमुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेच्या निषेधार्थ आणि मारेकऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी फलटण शहरात संविधान प्रेमींच्या वतीने मोठा निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
निषेध मोर्चा माहिती
दिनांक: 18 डिसेंबर 2024
वेळ: सकाळी 10:30 वाजता
ठिकाण: मंगळवार पेठ, फलटण
प्रारंभस्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर
मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
फलटण शहर व तालुक्यातील सर्व बौद्ध समाजातील भीम सैनिकांना या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली एकजूट दाखवावी असे आवाहन करण्यात येत आहे. संविधानिक मार्गाने निषेध नोंदवून समाजाच्या न्यायासाठी पाठिंबा उभा करणे हे प्रत्येक संविधानप्रेमीचे कर्तव्य आहे.