
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक वेगवेगळ्या घटना घडताना दिसत आहेत. सईला चुकीचे औषध दिल्यामुळे ती आजारी पडते. सावनी याचा फायदा घेते आणि सईला सागरपासून वेगळे करते. मात्र, सावनी सईला थोडाही वेळ देत नाही. ती तिच्या कामात व्यग्र असते. सई सतत मुक्ताला फोन करताना दिसते. आता सागर आणि सावनीच्या घटस्फोटाची तारीख असते. अखेर त्यांचा घटस्फोट देखील झाला आहे. त्यानंतर आता सईची कस्टडी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








