
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. सागर आणि मुक्तामध्ये जवळीक निर्माण होत आहे. दोघे एकमेकांच्या अखंड प्रेमात बुडाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सावनीच्या लग्नाची तयारी सुरु असताना हर्षवर्धनला मिहिका आवडू लागली आहे. तो आता सावनी सोडून मिहिकाच्या मागे लागला आहे. हे जेव्हा मुक्ताला कळेल तेव्हा काय होणार? हे पाहण्यासारखे आहे.







