
लेखक-अभिनेते-दिग्दर्शक अशा बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचे प्रवीण तरडे सध्या मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. ‘देऊळबंद’, ‘मुळशी पॅटर्न’ असो वा ‘सरसेनापती हंबीरराव’ प्रत्येक चित्रपटातून प्रवीण तरडे यांचे एक नवे रूप पाहायला मिळाले. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दबदबा असणारे प्रवीण तरडे एका चित्रपटासाठी किती मानधन घेत असतील असा प्रश्न सर्वांना पडला आहे.







