
अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी प्रतीक बब्बरने जाहिरात-चित्रपट निर्माता प्रल्हाद कक्कर यांच्यासोबत असिस्टंट म्हणून काम केले होते. दरम्यानच्या काळात त्याने स्वतः देखील जाहिरातींमध्ये काम करण्यास सुरुवात केली. प्रतीक बब्बर याने ‘जाने तू या जाने ना’, ‘धोबी घाट’, ‘एक दीवाना था’, ‘मुल्क’, ‘इश्क’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर, ‘हिकप्स अँड हुकअप्स’ सारख्य वेब सीरिजमध्येही काम केले आहे.







