
प्रथमेशने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाल्याचे पोस्ट शेअर सांगिलते आहे. या पोस्टमध्ये प्रथमेशने लिहिले आहे की, “एक नवीन सुरुवात. खूप सुंदर विषय, आणि मातृदिन सोबत या सिनेमाचे खूप गोड नातं आहे.” प्रथमेश ने दिलेल्या या कॅप्शन मुळे हा चित्रपट एका वेगळ्याच धाटणीचा असणार आहे, यात वाद नाही. शिवाय प्रथमेश देखील एका वेगळ्या रूपात या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.








