फलटण( साहस Times ) : मौजे सासकल गावचे सुपुत्र किरण पोपट घोरपडे यांचे चिरंजीव डॉ.प्रणीत उज्वला किरण घोरपडे यांनी मारी स्टेट युनिव्हर्सिटी,रशिया येथे उत्कृष्ट श्रेणी सह वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस पदवी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संपादित केली.डॉ. प्रणित उज्वला किरण घोरपडे यांचे वडील सध्या निकोप हास्पिटल, फलटण येथे वैद्यकीय कर्मचारी म्हणून सेवा देत आहेत. प्रचंड, जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम घेऊन डॉ. प्रणित उज्वला किरण घोरपडे यांनी हे यश संपादित केले आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कमला निंबकर बालभवन फलटण येथे झाले असून इयत्ता 11 वी व इयत्ता 12 वी पर्यंत चे शिक्षण मुधोजी हायस्कुल फलटण येथे झाले आहे.त्याच्या या यशाबद्दल परिषदेचे माजी सभापती विद्यमान विधान परिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, माढा लोकसभेचे माजी खासदार श्रीमंत रणजीतसिंह नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सचिन कांबळे पाटील, माजी आमदार दीपकराव चव्हाण, सासकल गावच्या सरपंच उषा राजेंद्र फुले, उपसरपंच सोनाली मंगेश मदने व सर्व ग्रामपंचायत सदस्य, वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विभागाचे अध्यक्ष भीमराव घोरपडे, वंचित बहुजन आघाडीचे फलटण तालुका अध्यक्ष महावीर भालेराव,पंचायत समितीचे माजी सदस्य, बापूराव जगताप, सासकल जन आंदोलन समितीचे अध्यक्ष शिवाजी मुळीक, विनायक मदने, ऍड. रामचंद्र घोरपडे,सामाजिक कार्यकर्ते सोमीनाथ घोरपडे,सासकल गावचे ग्रामस्थ व मित्रमंडळ, कुटुंबीय यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.