Prakash Ambedkar : भाजपची बी टीम… भाजपची बी टीम… या आरोपांना उत्तर देऊन थकलोय! प्रकाश आंबेडकर संतापले

0
15
Prakash Ambedkar : भाजपची बी टीम… भाजपची बी टीम… या आरोपांना उत्तर देऊन थकलोय! प्रकाश आंबेडकर संतापले


वंचितवर बी-टीमचा आरोप करताना केल्या जाणाऱ्या युक्तिवादाची उत्तरंही प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहेत. मी निवडणूक लढवतो म्हणून मला भाजपची बी-टीम म्हटलं जातं. पण, मी निवडणूक का लढू नये? भारतात द्विपक्षीय व्यवस्था आहे का? तसं असेल तर काँग्रेसच्या समर्थकांनी त्यांच्या जातीयवादी आणि हुकूमशाही धन्यांना १९५० चा लोकप्रतिनिधी कायदा बदलायला सांगावा, असं आंबेडकर यांनी सुनावलं आहे. मी काँग्रेसवर टीका करतो असाही माझ्यावर आरोप करणाऱ्यांचा युक्तिवाद असतो, पण मी भाजपवर सर्वाधिक टीका करतो हे त्यांना दिसत नाही, असं आंबेडकर म्हणतात.



Source link