
आता देशातील केवळ 5 टक्के लोकसंख्या गरीब आहे, अशी माहिती नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी उपभोग आणि खर्च सर्वेक्षण अहवाल जारी करताना दिली.
नवी दिल्ली : आता देशातील केवळ 5 टक्के लोकसंख्या गरीब आहे, अशी माहिती नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी उपभोग आणि खर्च सर्वेक्षण अहवाल जारी करताना दिली. सर्वेक्षणानुसार, देशातील सर्वांत गरीब 5 टक्के लोकांचा मासिक दरडोई ग्राहक खर्च ग्रामीण भागात 1,441 रुपये आणि शहरी भागात 2,087 रुपये आहे.
सुब्रमण्यम यांनी दिलेल्या माहितीत म्हटले की, गरिबीची व्याख्या तेंडुलकर समितीचा एक जुना अहवालानुसार होते. जर आपण या सर्वेक्षणाच्या आकडेवारीसह एकत्र केले तर असे दिसून येते की, भारतात आता फक्त 5 टक्क्यांपेक्षा कमी गरीब आहेत.








