Friday, July 17, 2026
Home Blog Page 334

होय! आम्हीच दहशतवाद पोसला, पाकची कबुली, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं वक्तव्य

0
होय! आम्हीच दहशतवाद पोसला, पाकची कबुली, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं वक्तव्य


Khawaja Asif : पाकिस्तानने दहशतवाद्यांना पोसल्याची कबुली खुद्द पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर भारतानं संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानचा भांडाफोड करत चांगलंच झापलं आहे. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालणारा देश असल्याचं भारताच्या प्रतिनिधी योजना पटेल यांनी ठणकावून सांगितलं. पाहूयात सविस्तर

पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसत होता, आसिफ ख्वाजांची कबुली

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानच्या कारनाम्यांचं बिंग स्वत:च फोडलं आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसत होता अशी कबुली खुद्द संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे. दहशतवाद्यांना प्रोत्साहन दिल्याचे गंभीर परिणाम पाकिस्तान भोगत असल्याचं देखील ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे. दरम्यान यानंतर भारतानं संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानची पोलखोल केली आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नेते भारताविरोधातच गरळ ओकाताय. त्यात आता ख्वाजा आसिफ यांची देखील भर पडली आहे. भारतातील आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भारताकडून हा सर्व ड्रामा सुरु असल्याचं वक्तव्य ख्वाजा आसिफ यांनी केलं आहे.

भारत पाकविरोधात युद्ध करू शकतो?

मागील काही दिवसांपासून पाकिस्तानी नेते भारताला धमकी देत आहेत. हनिफ अब्बासी यांनी तर भारताला थेट अणुबॉम्बची धमकी दिली होती. दरम्यान हनिफ अब्बासी यांच्या धमकीला भारताचे निवृत्त मेजर कर्नल जी.डी बक्षीसींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधला तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात नसल्याचं पाकिस्तानानं वारंवार सांगितलं. मात्र, दहशतवाद्यांचा खरा पाठिराख हा पाकिस्तानच असल्याचं खुद्द त्यांच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे.

तुर्कीच्या मदतीने पाकिस्तान भारताला टक्कर देणार? 

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाच वातावरण आहे. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांकडून सीमारेषेवर सैन्य आणि युद्धसामग्रीची जमवाजमव करण्यात येत आहे. अशातच तुर्कीने पाकिस्तानला अत्याधुनिक युद्धसामुग्री पाठवल्याची माहिती सध्या समोर येत आहे. तुर्कीने सी-130 या विमानातून पाकिस्तानला युद्धासाठी दारुगोळा आणि ड्रोन पुरवल्याची माहिती आहे. परंतु, तुर्कीने या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे. 





Source link

लेडीज बारवरील कारवाईत कल्याण डोंबिवली महापालिकेचे कर्मचारी अडकले

0
लेडीज बारवरील कारवाईत कल्याण डोंबिवली महापालिकेचे कर्मचारी अडकले



police raid against ladies bar at Ulhasnagar KDMC employees caught in action लेडीज बारवरील कारवाईत कल्याण डोंबिवली महापालिकेचे कर्मचारी अडकले





Source link

मला हाच जावई हवा म्हणायची, पतीनं ऐकलं नाही! जावयासोबत आणखी एक सासू पसार…

0
मला हाच जावई हवा म्हणायची, पतीनं ऐकलं नाही! जावयासोबत आणखी एक सासू पसार…


उत्तर प्रदेशातील गोंडा येथे एका सासू आणि जावयाची प्रेमकहाणी समोर आली आहे. यामध्ये, एका 44 वर्षीय महिलेच्या पतीने आपल्या पत्नीची बेपत्ता व्यक्तीची तक्रार नोंदवताना पोलिसांसमोर दावा केला आहे की त्याची पत्नी तिच्या भावी जावयासह निघून गेली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हे प्रकरण दुबौलिया पोलिस स्टेशन परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या एका तरुणाचे लग्न खोडारे येथे राहणाऱ्या एका मुलीशी निश्चित झाले होते. लग्न ठरल्यानंतर, तो तरुण त्याच्या भावी सासूशी खूप बोलू लागला. आता महिलेच्या पतीने त्याच्या भावी जावयावर त्याच्या पत्नीचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, तो तरुण आणि त्याचे संपूर्ण कुटुंब बेपत्ता आहे आणि फोनवरून पोलिसांना दिलेल्या निवेदनात त्याने दावा केला आहे की ती महिला त्याच्यासोबत नाही.

सासू-सून-जावईच्या प्रेमकथेत अनेक ट्विस्ट

हे प्रकरण उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या पतीचे म्हणणे आहे की त्याची पत्नी तिच्या होणार्‍या जावयासह पळून गेली आहे आणि दोघांनी शहरातील एका मंदिरात लग्न केले. दुसरीकडे, तरुणाने हे आरोप फेटाळले आहेत, परंतु त्याचे कुटुंब गाव सोडून पळून गेले आहे. महिलेच्या पतीचे म्हणणे आहे की, अलिगडमधील सासू आणि जावयाची प्रेमकहाणी उघडकीस आल्यानंतर तिने तिच्या पतीला त्याच्या भावी जावयाशी बोलण्यास मनाई केली होती. पत्नी सहमत नव्हती आणि तासन्तास बोलत राहिली. यामुळे निराश होऊन त्याने लग्न मोडले आणि आपल्या मुलीचे लग्न दुसऱ्या मुलासोबत निश्चित केले. आता त्याची बायको घर सोडून गेली आहे.

पोलिसांनी सांगितले की बेपत्ता व्यक्तीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आम्ही महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पोलिसांचे म्हणणे आहे की मुलाने फोनवर सांगितले की अशा आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही आणि त्याने गोंडा येथे येण्यास नकार दिला आहे. पोलिसांनी सांगितले की, तरुणाने सांगितले की तो नोकरीसाठी चेन्नईला आहे. आम्ही पुढील कारवाई करत आहोत.





Source link

Delhi governments big decision approval of school fee bill will put a damper on the arbitrariness of private schools

0
Delhi governments big decision approval of school fee bill will put a damper on the arbitrariness of private schools



Delhi governments big decision approval of school fee bill will put a damper on the arbitrariness of private schools | दिल्ली सरकारचा मोठा निर्णय, शालेय शुल्क नियमन विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी; खासगी शाळांच्या मनमानीला बसणार चाप?





Source link

Pahalgam Attack Update: गोळी झाडताच झिपलाइन ऑपरेटर म्हणाला ‘अल्लाह हू अकबर…’; NIA अधिकारी म्हणाले की, ‘हे तर राम…’

0
Pahalgam Attack Update: गोळी झाडताच झिपलाइन ऑपरेटर म्हणाला ‘अल्लाह हू अकबर…’; NIA अधिकारी म्हणाले की, ‘हे तर राम…’


Pahalgam Attack Update: पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे भयानक क्रूर दाखवणारा अजून एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये, एक माणूस झिपलाइनचा आनंद घेताना दिसत आहे अन् खाली जमिनीवर दहशतवादी त्यांच्या भयान कृत्य करत आहेत. या व्हिडीओमधील पर्यटकाने त्या दिवशी घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं. तो म्हणाला की,  त्या दिवशी अचानक गोळीबाराचे आवाज येऊ लागतात. झिपलाइन ऑपरेटर मुजम्मिल हळू आवाजात ‘अल्लाह-हू-अकबर’ चा नारा देऊ लागला. पुढे पर्यटक म्हणला की, तो ही दुर्दैवी घटना समजू शकत नाही. तो उत्साहित दिसत होता. मुझम्मिलच्या घोषणेचा त्याला निश्चितच त्रास झाला कारण इतर लोकांना झिपलाइनवर सोडताना, मुझम्मिल काहीही बोलला नाही आणि तो सामान्यपणे वागत होता. अचानक त्याचे वर्तन असामान्य वाटले.’

पर्यटकाच्या दावानंतर एनआयएने सोमवारी संध्याकाळी मुझम्मिलला पुन्हा पहलगाम पोलीस ठाण्यात बोलावले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, व्हिडीओ समोर येण्यापूर्वीच, एनआयएने मुझम्मिलला झिपलाइन ऑपरेटर असल्याबद्दल आणि घटनास्थळी उपस्थित असल्याबद्दल आधीच चौकशी केली होती. एनआयएच्या सूत्रांनुसार, मुझम्मिलचे जयजयकार ही धक्कादायक किंवा अचानक घडणाऱ्या गोष्टीची “नैसर्गिक प्रतिक्रिया” होती आणि ती हिंदूंनी ‘हे राम’ म्हणण्यासारखीच होती, असे एनआयएच्या सूत्रांनी इंडिया टुडे टीव्हीला सांगितलंय. 

दुसरीकडे मुझम्मिलचा भाऊ मुख्तार अहमद कुम्हारने सांगितले की, त्याचा भाऊ 3 वर्षांपासून बैसरन व्हॅलीमध्ये काम करत आहे. 22 एप्रिल रोजी हल्ला झाला तेव्हा तो घरी पळून गेला आणि घाबरला. व्हिडीओमध्ये ‘अल्लाह-हू-अकबर’ म्हणत असलेला व्यक्ती त्याचा भाऊ आहे. मुख्तार अहमद कुम्हार पुढे म्हणाला की, ‘व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की माझ्या भावालाही तिथे काय चालले आहे हे माहित नव्हतं’ 

मी हवेत होतो अन् खाली…

व्हायरल झालेल्या व्हिडीओतील व्यक्ती ही गुजरातच्या अहमदाबादची असून, त्यांचे नाव रिषी भट असे आहे. त्यादिवशी ते झिपलाइन वर अँडव्हेंजर स्पोर्ट्सचा आनंद घेत असताना काय घडलं याबद्दल सांगितलं आहे. तो म्हणाला, “आम्ही कुठल्याही टूर कंपनीच्या मार्फत गेलो नव्हतो. आम्ही स्वतंत्र गेलो होतो. मी 16 तारखेला अहमदाबाद मधून निघालो. 22 तारखेला जेव्हा घटना घडली तेव्हा मी पहलगाममध्ये होतो. 12 वाजता आम्ही तेथे पोहोचलो, घोड्यावर बसून वरती गेलो, फोटो वगैरे काढले आणि मग झिपलाईनसाठी गेलो. माझ्या मुलानंतर मी झिपलाइनवर गेलो. मी तिथे हवेत असताना अचानक 4 ते 5 वेळा गोळीबार झाला.”

तीन वेळा ‘अल्लाहू अकबर’ ओरडून…

“पहिले 30 सेकंद मला काहीच समजलं नाही. मी माझ्याच धुंदीत मजा मस्ती करत होतो. मग मला कळलं की खाली गोळीबार सुरु आहे. लोकांचा जीव जातोय. 5-6 जणांचा गोळ्या लागल्या आहेत. त्यानंतर मला कळलं की इथे दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. ते दहशतवादी तीनदा ‘अल्लाहू अकबर’ ओरडले आणि त्यानंतर गोळीबाराला सुरुवात झाली. माझ्या आधी ज्या दोन कुटुंबानी झिपलाइन केलं होतं, त्यातील पुरुषांना धर्म विचारून आणि हिंदू असल्याचं सांगितल्यावर गोळ्या घालून मारण्यात आलं होतं. माझ्या मुलाने आणि पत्नीने मला हे सांगितलं. मग मी खाली उतरताच सगळ्यांना घेऊन जीव वाचवायला पळून टेकडीवरू खाली गेलो.”

असा वाचला जीव…

“आम्ही धावत असताना एक मोठा खड्डा होता, तेथे बाकी लोकंही लपले होते. तेथेच आम्हीही लपलो. 8-10 मिनिटांनी थोडा गोळीबार कमी झाला. आम्ही पुन्हा धावत असताना परत गोळीबार सुरु झाला. त्यात काहींना गोळी लागली. आमच्या डोळ्यादेखत अंदाजे 15-16 लोकांना गोळ्या लागल्या. आम्ही मेन गेट वर पोहोचलो तेव्हा स्थानिक लोक निघून गेले होते. एक घोडेवाला होता, तो आम्हाला पुढे घेऊन जात होता. त्यावेळी आम्हाला भारतीय आर्मीचे लोकही भेटले. आर्मीच्या जवानांनी आम्हा पर्यटकांना कव्हर केले होते,” असे रिषी भट म्हणाले.





Source link

Traffic changes have been made पीएमपी बसला प्रवेश बंद

0
Traffic changes have been made पीएमपी बसला प्रवेश बंद


पुणे : अक्षय तृतीयेनिमित्त छत्रपती शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणारी भाविकांची गर्दी विचारात घेऊन बुधवारी (३० एप्रिल) वाहतूक बदल करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी रस्ता, गणेश रस्ता, तसेच लक्ष्मी रस्ता परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहे. या भागातील पीएमपी बस सेवा पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी सात ते रात्री बारा यावेळेत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी रस्ता, गणेश रस्ता, लक्ष्मी रस्त्याचा वापर करणाऱ्या मोटारचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच पीएमपी बससेवा पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे अमोल झेंडे यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी रस्त्यावरील स. गो. बर्वे चौकातून (माॅडर्न कॅफे हाॅटेल) स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, खंडोजीबाबा चौक, टिळक चौकमार्गे इच्छितस्थली जावे. स. गो. बर्वे चौकातून महापालिकेकडे जाणाऱ्या वाहनांनी जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक,

हेही वाचा

काँग्रेस भवन या मार्गाने महापालिका भवन येथे जावे. दारुवाला पूलाकडून फडके हौदमार्गे जाणारी पीएमपी बस सेवा पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चाैक (बुधवार चौक) दरम्यान गर्दी वाढल्यास या भागातील वाहतूक बंद करून बाजीराव रस्ता, शनिवारवाडा मार्गाने वळविण्यात येईल. वाहनचालाकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त झेंडे यांनी केले आहे.





Source link

काश्मिरी वाटत नाहीत, हिंदू आहात का? पहलगाम हल्ल्याच्या एक दिवस आधीही दहशतवाद्यांनी विचारला होता धर्म

0
काश्मिरी वाटत नाहीत, हिंदू आहात का? पहलगाम हल्ल्याच्या एक दिवस आधीही दहशतवाद्यांनी विचारला होता धर्म


काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यात जवानांच्या वेशातील दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २५ पर्यटकांसह २६ जण ठार झाले. आता या हल्ल्याशी संबंधित अनेक नवे व्हिडिओ आणि दावे समोर येत आहेत, जे दहशतवाद्यांच्या कारस्थानाचा पर्दाफाश करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील एका कुटुंबाने दावा केला आहे की, २२ एप्रिलच्या घटनेच्या एक दिवस आधी म्हणजे २१ एप्रिल रोजी बैसारण खोऱ्यात दहशतवाद्यांनी त्यांच्या धर्माविषयी विचारणा केली होती.



Source link

Mehbooba Mufti Demand to Reconsider the decision to deport Pakistani Citizens

0
Mehbooba Mufti Demand to Reconsider the decision to deport Pakistani Citizens



Mehbooba Mufti Demand to Reconsider the decision to deport Pakistani Citizens | “३०-४० वर्षे भारतात राहिलेल्या विवाहित महिलांनी कुठे जायचं?” मेहबुबा मुफ्तींचा सरकारला सवाल; म्हणाल्या, “अमानवीय…”





Source link

‘पाकिस्तान झिंदाबाद’ नारेबाजी करणाऱ्याला जमावाने बेदम मारहाण करत ठार मारले; १० जणांना अटक

0
‘पाकिस्तान झिंदाबाद’ नारेबाजी करणाऱ्याला जमावाने बेदम मारहाण करत ठार मारले; १० जणांना अटक


Karnataka mob lynching : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे. दरम्यान, कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याच्या आरोपावरून जमावाने एका व्यक्तीची बेदम मारहाण करत हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान ‘पाकिस्तान झिंदाबाद’चा नारा देणाऱ्या व्यक्तीवर जमावाने संताप व्यक्त करत हल्ला केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे. इतर संशयितांचा शोध सुरू आहे.



Source link

‘नीट’मुळे विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेत बदल…, आता परीक्षा ४ मेऐवजी २ मे रोजी होणार…

0
‘नीट’मुळे विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेत बदल…, आता परीक्षा ४ मेऐवजी २ मे रोजी होणार…



‘नीट’मुळे विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेत बदल…, आता परीक्षा ४ मेऐवजी २ मे रोजी होणार… Maharashtra LLB CET 2025 rescheduled to May 2–3 due to NEET-UG centre date clash





Source link