Thursday, June 25, 2026
Home Blog Page 3172

Aditya Roy Kapur: महिलेने जबरदस्ती किस केलं? आदित्य रॉय कपूर म्हणतो…

0
Aditya Roy Kapur: महिलेने जबरदस्ती किस केलं? आदित्य रॉय कपूर म्हणतो…


आदित्य रॉय कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या प्रसंगावर भाष्य केले आहे. आदित्य म्हणाला की, ‘खरे सांगायचे तर मी याने फारसा प्रभावित झालो नाही. त्याक्षणी मला ती परिस्थिती हाताळायची होती. मी त्यांच्यावर टीका करणार नाही किंवा त्यांना वाईटही बोलणार नाही. त्या व्यक्तीला माझ्याबद्दल प्रेम वाटत होते आणि त्यनी ते प्रेम व्यक्त केले. ती त्यांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत होती. पण, नंतर मी या प्रसंगावरफारसा विचार केला नाही.



Source link

Ramcharan : अनवाणी पायानेच साऊथ सुपरस्टार निघाला ऑस्कर वारीला; कारण ऐकून कराल कौतुक!

0
Ramcharan : अनवाणी पायानेच साऊथ सुपरस्टार निघाला ऑस्कर वारीला; कारण ऐकून कराल कौतुक!


नुकताच अभिनेता हैदराबाद विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी रामचरण याने काळे कपडे परिधान केले होते. तर, पायात चप्पल देखील नव्हती. अभिनेत्याला या अवतारात पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले. रामचरणचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रामचरणच्या या लूक मागचं कारण देखील खास आहे, जे जाणून घेतल्यावर चाहते देखील आनंदी होतील.



Source link

Sai Tamhankar: सई ताम्हणकरचा ‘पॉंडीचेरी’ चित्रपट पाहायचा? ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

0
Sai Tamhankar: सई ताम्हणकरचा ‘पॉंडीचेरी’ चित्रपट पाहायचा? ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित


‘पॉंडीचेरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांनी केले असून या चित्रपटात सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, वैभव तत्ववादी, नीना कुळकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर ‘सहेला रे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी यांनी केले असून या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे आणि सुमित राघवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव आणि हेमांगी कवी प्रमुख भूमिकेत आहेत.



Source link

Rang Maza Vegla: पोलिसांच्या तावडीतून कार्तिक फरार! मुलींच्या चुकीमुळे पुन्हा अडकणार?

0
Rang Maza Vegla: पोलिसांच्या तावडीतून कार्तिक फरार! मुलींच्या चुकीमुळे पुन्हा अडकणार?


साक्षीच्या ऑपरेशन दरम्यान कार्तिकने मुद्दाम तिचा जीव घेतला असा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून, यामुळेच त्याला पोलिसांनी अटक केली होती. सध्या या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून, कोर्टात केस देखील लढवली जात आहे. मात्र, तो पर्यंत कार्तिकला पोलीस कोठडीत राहावे लागणार होते. यावेळी कार्तिकने पोलिसांच्या तावडीतून पळ काढला असून, त्याने मुलींना फोन करून याची कल्पना दिली आहे. कार्तिकने मुलींना फोन करून आपण त्यांना भेटायला येत असल्याचे सांगितले.



Source link

KGF: ‘केजीएफ’मधील अभिनेता करणार भाजपमध्ये प्रवेश

0
KGF: ‘केजीएफ’मधील अभिनेता करणार भाजपमध्ये प्रवेश



KGF: हा अभिनेत्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे



Source link

Subi Suresh Death: साऊथ मनोरंजन विश्वाला मोठा धक्का; प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन

0
Subi Suresh Death: साऊथ मनोरंजन विश्वाला मोठा धक्का; प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन


आत्तापर्यंत साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील ८ सेलिब्रिटींनी लागोपाठ या जगाचा निरोप घेतला आहे. वाणी जयराम, तारका रत्न, टीपी गजेंद्रन, के विश्वनाथ, मायलसामी, एसके भगवान, श्रीजी कृष्ण राव आणि आता सुबी सुरेश यांच्या निधनामुळे दक्षिणात्य मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.



Source link

Intimate Scenes: इंटिमेट सीन शूट करताना लाजत होता अभिनेता, नाईलाजास्तव दिग्दर्शकानं उचललं ‘हे’ पाऊल

0
Intimate Scenes: इंटिमेट सीन शूट करताना लाजत होता अभिनेता, नाईलाजास्तव दिग्दर्शकानं उचललं ‘हे’ पाऊल



Intimate Scenes: छोट्या पडद्यावरील सुपरहिट मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्याने एका मुलाखतीमध्ये हे सांगितले आहे.



Source link

खेलो इंडिया पदक विजेत्यांची लाखाची उड्डाणे; बक्षिसाच्या रकमेत यंदापासून भरीव वाढ | पुढारी

0


सातारा : विशाल गुजर : खेलो इंडियात पदक विजेते खेळाडू आता मालामाल होणार आहेत. राज्य शासनाच्या क्रीडा खात्याने घेतलेल्या निर्णयानुसार सुवर्णपदक विजेत्यास तीन लाख, रौप्य दोन लाख व कांस्यपदक विजेत्यास एक लाख रुपये दिले जाणार आहेत. याचा महाराष्ट्रातील 161 खेळाडूंना लाभ होणार आहे. जिल्ह्यातील पदक विजेत्या 9 खेळाडूंनाही त्याचा लाभ होणार असून त्यांना 21 लाख रुपये बक्षिसाची रक्कम मिळणार आहे.

मध्यप्रदेश येथे झालेल्या पाचव्या खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत महाराष्ट्राने विजेतेपद पटकावले. राज्यातील खेळाडूंनी 56 सुवर्ण, 55 रौप्य व 50 कांस्य अशी 161 पदकांची कमाई केली. पुणे, आसाम व हरियाणा येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले होते. मध्यप्रदेश येथे एकूण 24 क्रीडा प्रकारांत स्पर्धा झाली. यापूर्वी खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या खेळाडूस 1 लाख, रौप्य पदक विजेत्यास 75 हजार व कांस्य पदक विजेत्यास 50 हजार रुपये दिले जात होते. त्यात बदल करत खेळाडूंना भरघोस बक्षिसे देण्याचा निर्णय राज्य शासनाने यंदापासून घेतला आहे. राज्य शासनाच्या क्रीडा खात्याने घेतलेल्या निर्णयानुसार सुवर्णपदक विजेत्यास तीन लाख, रौप्य पदक विजेत्यास दोन लाख व कांस्यपदक विजेत्यास एक लाख रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील पदक विजेत्या खेळाडूंना भरीव लाभ होणार आहे.

खेलो इंडियात सातारा जिल्ह्यातील आदिती स्वामी हिने धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक व सांघिकमध्ये रौप्य अशी दोन पदक पटकावली असून तिला 5 लाख रुपये, श्रेया सपकाळ हिने मल्लखांब सांघिक प्रकारात रौप्यपदक मिळवले असून तिला दोन लाख रुपये मिळणार आहेत. प्रणाली पवार हिने मल्लखांब सांघिकमध्ये रौप्यपदक मिळवले असून तिला 2 लाख, अमृता चौगुले हिने ज्युदो खेळात 63 किलोवजन गटात रौप्य पदक मिळवले असून तिला 2 लाख, श्रुती गुळवे हिने मल्लखांब सांघिक प्रकारात रौप्य पदक मिळवले असून तिला दोन लाख, आकांशा बर्गे हिने मल्लखांबमध्ये रौप्य पदक पटकावले असून तिला दोन लाख, अस्मिता ढाणे हिने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकले असून तिला दोन लाख, रणवीर मोहिते याने मल्लखांबमध्ये रौप्य पदक मारले असून त्याला दोन लाख तर वेदांत शिंदे याने मल्लखांबमध्ये रौप्य पदक पटकावले असून त्याला 2 लाख रुपये मिळणार आहेत. भरघोस बक्षिसांमुळे खेळाला चालना मिळणार असून खेळाडूंनाही आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे.

जिल्ह्यातील खेळाडूंनी कमावली 10 पदके

खेलो इंडिया स्पर्धेत जिल्ह्याच्या खेळाडूंनी ठसा उमटवला आहे. जिल्ह्यातील सहभागी खेळांडूपैकी 9 खेळाडूंनी 10 पदके मिळवत सातार्‍याचा दबदबा राखला आहे. यामध्ये आदिती स्वामी हिने 1 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत मुलींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्याला 1 सुवर्णपदक, 9 रौप्य पदके मिळाली आहेत. जिल्ह्यातील खेळाडूंनी मल्लखांब, धनुर्विद्या, वेटलिफ्टींग आणि ज्युदो या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

खेलो इंडिया यूथ गेम्सने देशभरातील युवा खेळाडूंना क्रीडामंचक तयार झाले. जिल्ह्यातील युवा खेळाडूंचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. क्रीडा विभागाने त्यांच्यावर बक्षिसांची लयलूट केली असल्याने यापुढे अनेक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होऊन जिल्ह्याचा नावलौकिक करतील.
– युवराज नाईक, जिल्हा क्रीडाधिकारी



Source link

Nava Gadi Nava Rajya: आनंदीला कळणार रमाच्या मृत्युमागील सत्य! मालिका एक नव्या टप्प्यावर

0
Nava Gadi Nava Rajya: आनंदीला कळणार रमाच्या मृत्युमागील सत्य! मालिका एक नव्या टप्प्यावर


झी मराठी वाहिनीवरील जवळपास सर्वच मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या यादीमधील एक नाव म्हणजे ‘नवा गडी नवा राज्य.’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अक्षरश: घर केले आहे. प्रेक्षकांना हवीहवीशी वाटणारी ‘नवा गडी नवा राज्य’ ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे, ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे.



Source link

Urfi Javed: सामानासह फरार झालेला कॅब ड्रायव्हर तासाभराने आला अन् नशेत…; उर्फीचे ट्वीट व्हायरल

0
Urfi Javed: सामानासह फरार झालेला कॅब ड्रायव्हर तासाभराने आला अन् नशेत…; उर्फीचे ट्वीट व्हायरल


पुढे ती म्हणाली, ‘कॅब ड्रायव्हर परत येत नाही हे पाहून मी शेवटी एका मित्राला सांगितले. मुलाचा आवाज ऐकताच तो कॅब ड्रायव्हर घाबरला आणि तासाभराने परत आला. तो जेव्हा परत आला तेव्हा नशेत होता. हे पाहून मला धक्काच बसला. त्या नीट चालताही येत नव्हते. पार्किंगमध्येच होतो असे कारण दिले. माझ्या मित्राने इतक्या वेळा फोन केला तरी तो जागेवरुन हालला नव्हता. उबर हे महिलांसाठी सुरक्षित नाही. आधी ड्रायव्हर सामान घेऊन फरार होतो आणि दोन तासांनंतर नशेत परत येतो.’



Source link