Friday, June 26, 2026
Home Blog Page 3159

सातारा : पाचगणीलगतचा डोंगर होरपळला; वणव्यात सरपटणारे जीव भक्ष्यस्थानी | पुढारी

0









पाचगणी : पुढारी वृत्तसेवा : पाचगणी या पर्यटन स्थळालगत असणारा डोंगर बुधवारी दुपारी वणव्याच्या अग्निज्वालांनी होरपळला असून हिरवा शालू पांघरलेला डोंगर काळाकुट्ट राखेने भरला आहे. वन विभाग सुस्त असल्याने असंख्य सुक्ष्मजीव या वणव्यात होरपळले.
पाचगणी हे पर्यटन स्थळ सह्याद्रीच्या डोंगर कुशीत वसले आहे. दक्षिणेला डोंगरकड्यातून जावली तालुका सुरू होतो. तर, उत्तर पूर्वेला डोंगर कडा उतरला की, वाई तालुका लागतो. दरवर्षी तिन्ही बाजूंनी वणव्याच्या भडाग्रीने पर्यटन स्थळालगतचा परिसर होरपळून निघतो. त्याचा परिणाम पर्यटनस्थळाच्या हवामानावर नक्कीच होतो.

दरवर्षी लागणाऱ्या वणव्यांना पायबंद घातला जात नाही. जानेवारी, फेब्रुवारी महिना सुरू झाला की, हे वणवा सत्र सुरूच होते. पसरणी घाटात तसेच मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी वणवा लावू नये, निसर्ग वाचवा असे मोठे फलक जागोजागी दिसतात. मात्र, तरीही वणवे लागतातच. वन विभागाने वणवा लागू नये, यासाठी गावागावांत जनजागृती करण्याची मागणी होत आहे.

पर्यावरणप्रेमींनी जनजागृती करावी

एरवी निसर्ग संपदा वाचवण्याची भाषा करणारे पर्यावरण प्रेमी तसेच निसर्गप्रेमी मात्र, यावेळी गप्प बसतात. तर, वन विभागसुद्धा बघ्याची भूमिका घेत असतो. या वणव्यात अनेक सुक्ष्म जीव होरपळतात. तसेच गवतातील सरपटणारे लहान प्राणी, झाडांवर घरटे करून राहणारे पक्षी यांचा मात्र नाहक बळी जात आहे. याला जबाबदार कोण? उन्हाळ्यात याच पक्ष्यांकरिता पाणवठे बांधले जातात. मग, वणवे लावून त्यांनाच आपण आगीच्या भक्ष्यस्थानी का ढकलतो? असा सवाल उपस्थित केला जात आहे.











Source link

Vaalvi: ‘वाळवी’ चित्रपट थिएटरमध्ये पाहायचा आहे? मग ही बातमी नक्की वाचा

0
Vaalvi: ‘वाळवी’ चित्रपट थिएटरमध्ये पाहायचा आहे? मग ही बातमी नक्की वाचा


परेश मोकाशी यांची खासियत म्हणजे एका सामान्य विषयालाही ते असामान्य स्वरूप देतात. ‘वाळवी’च्या माध्यमातून ते असाच एक वेगळा विषय घेऊन आले आणि प्रेक्षकांनाही हा थ्रिलकॅाम प्रचंड आवडला. झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी निर्मित, परेश मोकाशी यांची कथा, पटकथा आणि संवाद लाभलेल्या ‘वाळवी’ या चित्रपटाने सिनेमागृहात यशस्वी अर्धशतक साजरे केले आहे. स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि नम्रता संबेराव यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.



Source link

कराडकरांच्या अलोट प्रेमाने भारावून गेलो : खा. उदयनराजे भोसले | पुढारी

0


कराड : पुढारी वृत्तसेवा : कराडकरांच्या अलोट प्रेमाने भारावून गेलो आहे. जनतेच्या सेवेत नेहमीच कार्यरत राहणार असून राजेंद्रसिंह यादव व विजयसिंह यादव मित्र परिवाराच्यावतीने महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेल्या या बैलगाड्या शर्यतीचे केलेले आयोजन शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. अशा स्पर्धामुळे बैलांना पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आले असून शेतकरी वर्गात उत्साह आला आहे, असे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

खा. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीच्या मैदानाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आ. आनंदराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव, हजारमाचीचे उपसरपंच प्रशांत यादव आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. छ. खा. उदयनराजे यांचे कराडमध्ये आगमन झाल्यावर त्यांनी प्रथम शिवतिर्थावरील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर विजयसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली मोटारबाईक रॅलीने उदयनराजेंना शर्यतस्थळी नेले. त्यांनी बैलगाडीतून रपेट मारली. ठिकठिकाणी नागरिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

बैलगाडी शर्यतीमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील ३०० बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचा शुभारंभ हजारमाची गावचे उपसरपंच प्रशांत यादव यांच्या हस्ते झाला. हजारो शौकीनांच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेत बैलगाड्या विजेत्या ठरल्या. यामध्ये प्रथम क्रमांक ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी, दुसरा क्रमांक वाघजाई प्रसन्न दिनेश भांडले पुणे कळंबी, तिसरा क्रमांक ईश्वरी चंद्रकांत शेलार, चौथा क्रमांक बाबू माने, पाचवा क्रमांक अमोल माने सोन्या शंभू ग्रुप नरसिंहपुर, सहावा क्रमांक रमेश जाधव सुपणे, सातवा क्रमांक भानुदास कासेगाव या सातही गाड्यांना रोख रक्कम व छत्रपती चषक विजयसिंह यादव यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक हणमंत पवार, विजय वाटेगावकर, स्मिताताई हुलवान, बाळासाहेब यादव, किरण पाटील, गजेंद्र कांबळे, प्रीतम यादव, निशांत ढेकळे, ओंकार मुळे, विनोद भोसले, राहुल खराडे तसेच नागरिक, बैलगाडी शर्यत शौकिनांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजेंद्रसिंह यादव व विजयसिंह यादव मित्रपरिवार, राजूभाऊ सूर्यवंशी, सोमनाथ सूर्यवंशी, जयवंतराव वीर, नितीन आवळे, पिंटू पाटील, योगेश पळसे, नरेश गुप्ता योगेश कोरडे यांनी परिश्रम घेतले. शर्यतीचे पंच म्हणून आबासाहेब जाधव, उदयसिंह पाटील, अशोक मदने, सागर धोकटे यांनी काम पाहिले.



Source link

सातारा : रामराजेंचे डाव शकुनी मामापेक्षा कपटी : खा. रणजितसिंह | पुढारी

0









साखरवाडी : पुढारी वृत्तसेवा : माझ्या विरोधात रामराजेंनी शकुनी मामापेक्षा अधिक कपटी डाव टाकले. मात्र, मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने ते सर्व डाव हाणून पाडले असल्याचा घणाघात खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विधानपरिषदचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर केला.

साखरवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित साखरवाडी जिल्हा परिषद गटाच्या संपर्क दौऱ्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे- पाटील, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय साळुंखे-पाटील, सरपंच रेखा जाधव, उपसरपंच अक्षय रुपनवर, माजी सरपंच विक्रम भोसले, पांडुरंग भोसले, सुरेश भोसले उपस्थित होते.

खा. रणजितसिंह म्हणाले, तालुक्यामध्ये राजे कुटुंबियांनी नवीन एकही संस्था काढली नसून श्रीराम साखर कारखाना जवाहर उद्योग समूहाला चालवायला दिला आहे. मालोजी बँक बुलढाणा बँकेला चालवायला दिली असल्याचा आरोप करुन ते म्हणाले, जे काम ज्याने केले आहे त्याला ते श्रेय मिळाले पाहिजे.

फलटण तालुक्यामध्ये होऊ घातलेली नवीन एमआयडीसी, निरा देवधर, धोम बलकवडीचा पाणी प्रश्न असेल, रेल्वेचा प्रश्न असेल त्याचबरोबर चोरीला गेलेले डीपी परत बसले असतील तर हे सर्व कामे मी केली म्हटले तर चालेल का? त्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार यांचे योगदान असून भविष्यात या भागामध्ये अजून महत्त्वाची कामे या मतदारसंघांमध्ये करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
सूत्रसंचलन हरिदास सावंत यांनी केले. यावेळी साखरवाडी जिल्हा परिषद गटातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 











Source link

Aai Kuthe Kay Karte: नवरी सजतेय! ‘आई कुठे काय करते’मधील अरुंधती लग्नासाठी तयार Video viral

0
Aai Kuthe Kay Karte: नवरी सजतेय! ‘आई कुठे काय करते’मधील अरुंधती लग्नासाठी तयार Video viral


आशुतोष आणि अरुंधतीचे लग्न होऊ नये, यासाठी अनिरुद्ध वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, त्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत. अरुंधतीच्या लग्नाच्या विषयामुळे देशमुख कुटुंबात आता चांगलाच गदारोळ माजला आहे. अरुंधती आणि आशुतोषचं लग्न मोडावं, म्हणून अनिरुद्ध नवनव्या शकला लढवताना दिसत आहे. मात्र, त्याच्या या सगळ्या प्रयत्नांना फोल ठरवत अरुंधती आपलं आणि आशुतोषचं नातं एक पाऊल पुढे नेणार आहे.



Source link

सातारा : लाचप्रकरणी मुख्याध्यापिका, शिक्षकाला अटक | पुढारी

0









सातारा : पुढारी वृत्तसेवा :  शिक्षण विभागातर्फे शाळेच्या वार्षिक तपासणीसाठी झालेल्या खर्चापोटी १८७५ रुपये मागून ही लाच स्वीकारल्याप्रकरणी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) महिला मुख्याध्यापकासह शिक्षकाला अटक केली. उंब्रज, ता. कराड येथील आदर्श प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे हे शिक्षक आहेत.

या घटनेने लाचप्रकरणी मुख्याध्यापिका, शिक्षकाला अटक शिक्षण विभाग हादरून गेला आहे. सौ. उज्ज्वला रघुनाथ पोळ (वय ५६, रा. शहापूर, ता. कराड) व बापू सर्जेराव सूर्यवंशी (रा. भुयाचीवाडी पो. पेरले, ता. कराड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील पोळ या मुख्याध्यापिका तर सूर्यवंशी हे सहशिक्षक असून दोघेही वर्ग ३ चे कर्मचारी आहेत.

अधिक माहिती अशी, याप्रकरणातील तक्रारदार या शिक्षक आहेत. उंब्रज, ता. कराड येथे आदर्श प्राथमिक विद्यामंदिर ही शाळा असून शिक्षण विभागाची वार्षिक तपासणी करण्यासाठी पथक आले होते. या पथकाची शाळेकडून सरबराई करण्यात आली होती. जेवणासह इतर खर्च झोडण्यात आला होता. यामुळे शाळेला चांगला शेरा मिळावा, यासाठी हा खटाटोप करण्यात आला होता. सर्व खर्च झाल्यानंतर तो खर्च वसूल करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिकाने खर्चाची रक्कम सांगून ती इतर शिक्षकांना देण्यास सांगितले. यावरून तक्रारदार शिक्षिका महिलेने एसीबीकडे तक्रार केली.

सातारा एसीबीमध्ये तक्रार आल्यानंतर महिला पोलिस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांनी तक्रारीची पडताळणी केली. यावेळी पैशांची मागणी होत असल्याचे समोर आले व ठरलेली रक्कम सहशिक्षक बापू सूर्यवंशी यांच्याकडे देण्यास सांगण्यात आले. लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबी विभागाने रंगेहाथ पकडून कारवाई केली. मुख्याध्यापिका व शिक्षकावर ट्रॅप झाल्याची माहिती समोर आल्यानंतर कराडसह जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. दरम्यान, संशयितांवर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.











Source link

सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी; दहावी, बारावीचे विद्यार्थी अडकले महामार्गावर | पुढारी

0









कराड : पुढारी वृत्तसेवा मलकापूर (ता. कराड) येथील उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याने पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे आज (शुक्रवार) सकाळी कराडनजीक महामार्गावर सुमारे चार ते पाच किलोमीटरहून अधिक वाहनांच्या रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. सकाळपासून सुरू झालेल्या या वाहतूक कोंडीत दहावी व बारावी परीक्षा देणारे विद्यार्थी अडकल्याने पालकवर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

पुणे-बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम मागील महिन्यापासून सुरू झाले आहे. कराड व मलकापूर येथील उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे. कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्याचे काम जवळपास 70 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. तर मलकापूर येथील कृष्णा हॉस्पिटलसमोरील उड्डाणपूल पाडण्यासाठी गुरूवारपासून वाहतूक व्यवस्थेत बदल करून वाहतूक सेवा मार्गावरून वळवण्यात आली आहे.

मुळात अरुंद असलेल्या सेवा रस्त्यावर डीपी जैन या ठेकेदार कंपनीकडून पूल पाडण्यासाठी बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. त्यामुळे कसेबसे एक अथवा दोन वाहन जाऊ शकते. महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असल्याने अशा परिस्थितीत वाहतूक कोंडी होणे अपेक्षितच होते. त्यामुळेच महामार्गाला पर्यायी मार्ग सुचवण्यात येऊन या मार्गावरून वाहतूक वळवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याचे आज पाहावयास मिळाले.

दहावी व इयत्ता बारावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा यापूर्वीच सुरू झाली आहे. परीक्षेला निघालेले विद्यार्थी महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकून पडले. अशात वाहतूक संथ गतीने पुढे सरकत असल्‍याने विद्यार्थ्यांनी पायी चालत जाणे पसंद केले. मात्र ग्रामीण भागातील तसेच कराड शहरालगतच्या परिसरातील विविध गावच्या विद्यार्थ्यांचे या वाहतूक कोंडीमुळे प्रचंड हाल झाले.

यापूर्वी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येतील असे सांगण्यात आले होते. मात्र प्रशासन आणि ठेकेदार कंपनीने उपाययोजनांकडे कानाडोळा केल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहन चालक, विद्यार्थी तसेच स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागला.

हेही वाचा : 











Source link

Oscars 2023: दीपिका पादूकोणने चाहत्यांना दिली गूडन्यूज, ‘ऑस्कर’शी आहे कनेक्शन

0
Oscars 2023: दीपिका पादूकोणने चाहत्यांना दिली गूडन्यूज, ‘ऑस्कर’शी आहे कनेक्शन


ऑस्कर २०२३मध्ये प्रेझेंटर्स म्हणून रिज अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोज, जेनिफर कॉनेली, एरियाना डीबोस, सॅमुअल एल जॅक्सन, ड्वेन जॉनसन, माइकल बी जॉर्डन, ट्रॉय कोत्सुर, जोनाथन मेजर्स, मेलिसा मॅक्कार्थी, जेनेल मोनाए, क्वेस्टलव, जो सलदाना आणि डोनी येन यांची निवड करण्यात आली आहे. या यादीमध्ये दीपिकाने स्थान कमावत भारतीयांच्या मान अभिमानाने उंचावल्या आहेत.



Source link

Dilip Joshi: ‘जेठालाल’ला जीवे मारण्याची धमकी, २५ गुंडांनी घराबाहेर घेरले

0
Dilip Joshi: ‘जेठालाल’ला जीवे मारण्याची धमकी, २५ गुंडांनी घराबाहेर घेरले


इंडिया टूडेने दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च रोजी नागपूर कंट्रोल रुमला एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन दिलीप जोशी यांच्या घराबाहेर २५ लोक हत्यारे घेऊन उभी असल्याची माहिती दिली गेली होती. फोन करणाऱ्या व्यक्तीने त्याचे नाव काटके असे सांगितले. ‘ज्या व्यक्तीने मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली होती त्याच व्यक्तीने हा फोन केला होता’ अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.



Source link

Jhimma: ‘झिम्मा’ चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये पाहण्याची संधी, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

0
Jhimma: ‘झिम्मा’ चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये पाहण्याची संधी, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित


महिला दिनानिमित्त पुन्हा एकदा प्रदर्शित होणाऱ्या ‘झिम्मा’ चित्रपटाबद्दल निर्माती क्षिती जोग म्हणतात, “माझं या चित्रपटाशी एक भावनिकदृष्ट्या नातं जोडलं गेलं आहे. हा चित्रपट मी पुन्हा एकदा महिलादिनी माझ्या मैत्रिणीसोबत बघून साजरा करणार आहे. हा चित्रपट पुन्हा एकदा त्याच जोमात प्रदर्शित होणार आहे, याचा मला आनंद आहे. महिलांना हा चित्रपट आपल्या जीवनाशी भावनिकदृष्ट्या जवळीक साधणारा वाटला. अनेकींनी हा चित्रपट पाहून संसारातून वेळ काढत आपल्या मैत्रिणींसोबत सहलींचा बेतही बनवला. ज्या स्त्रिया कधीच चित्रपटगृहात गेल्या नव्हत्या, त्या खास ‘झिम्मा’ बघायला गेल्या. अनेकींनी यांचे हे अनुभव प्रत्यक्ष, सोशल मीडियाद्वारे, मेसेज करून आमच्यापर्यंत पोहोचवले. आयुष्य भरभरून जगायला शिकवणारा हा चित्रपट आहे.”



Source link