
यानंतर अभिनेत्री पूजा हेगडे आपली आलिशान कार घेऊन निघून गेली. या गाडीची पूजा करण्यासाठी आलेल्या पूजा हेगडे हिने निळ्या रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता. तर, तिने केस मोकळे सोडले होते. यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तिच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहेत. काहींनी अभिनेत्रीला तिच्या या नव्याकोऱ्या गाडीसाठी अभिनंदन केले आहे. तर, काही लोक या गाडीचे फीचर्स आणि वेगवगेळ्या गोष्टी सांगत आहेत. तर, काहींनी इतक्या पैशात तर आमचा एक राजवाडा बनेल, असे देखील म्हटले आहे.








