Pooja Deol: पत्नी लाइमलाइटपासून लांब का असते? सनी देओलने सांगितले कारण

0
18
Pooja Deol: पत्नी लाइमलाइटपासून लांब का असते? सनी देओलने सांगितले कारण


सनी देओलने ब्रिटिश शाही कुटुंबातील सदस्य असलेल्या लिंडाशी लग्न केले. लग्नानंतर तिचे नाव बदलून पूजा असे ठेवले. पूजा ही नेहमीच लाइमलाइटपासून लांब असते. त्यामुळे तिच्याविषयी बोलताना सनी देओल म्हणाला की, “आम्ही सर्वजण वैयक्तिक आयुष्यात असेच आहोत. आम्ही अशाच मित्रमैत्रिणींच्या घरी किंवा कार्यक्रमाला जाणे पसंत करतो, जिथे आम्ही आरामात वावरू शकतो. आम्ही सतत कॅमेरासमोर शूटिंग करत असतो. जिथे जातो तिथे लोक आमच्याकडे एकटक पाहत असतात. त्यामुळे खासगी आयुष्यात आम्हाला अशी वेळ हवी असते, जिथे आम्हाला कोणीच पाहत नसेल. म्हणूनच मला वेळ असेल तेव्हा मी परदेशात फिरणे किंवा राहणे पसंत करतो. कारण तिथे कोणीच तुम्हाला त्रास देत नाही.”



Source link