
मध्य प्रदेशात मोहनसिंग यादव यांच्याकडे राज्याची कमान सोपवल्यानंतर राजकीय वर्तुळात यादव जातीतील लोकांना प्रतिनिधित्व देण्याचा हा भाजपाचा मास्टरस्ट्रोक असल्याचे बोलले जात आहे. याला ‘यादव व्होट बँक’ बोलली जात आहे.
लखनौ : मध्य प्रदेशात मोहनसिंग यादव यांच्याकडे राज्याची कमान सोपवल्यानंतर राजकीय वर्तुळात यादव जातीतील लोकांना प्रतिनिधित्व देण्याचा हा भाजपाचा मास्टरस्ट्रोक असल्याचे बोलले जात आहे. याला ‘यादव व्होट बँक’ बोलली जात आहे. यादव मतांच्या भरवशावर आपले राजकारण चमकवणाऱ्या पक्षांचीही झोप उडाली आहे. भाजपच्या या निर्णयावर संपातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
पीएम मोदींना त्यांचा चार वेळा मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम मोडू द्यायचा नव्हता, म्हणून त्यांनी जाणूनबुजून शिवराज यांचे पद हिसकावून घेतल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे. मोहन यादव मुख्यमंत्री झाल्यानंतर सपाचे प्रवक्ते मनोज काका म्हणाले की, हे केवळ भाजपच्या राजकारणाचे प्रतिकात्मक उदाहरण आहे. अखिलेश यादव यांच्या भीतीने हे केले जात आहे. भाजप अखिलेश यादव यांच्या विचारसरणीला घाबरत आहे. भाजप ही कॉर्पोरेट कंपनी असून, सीईओ आणि इतर सर्व लोक कर्मचारी आहेत.









