Political News | कर्नाटकात काँग्रेसच्या अडचणींत होणार वाढ; अनेक मंत्री, आमदारांचा लोकसभा लढवण्यास नकार | Navarashtra (नवराष्ट्र)

0
18
Political News | कर्नाटकात काँग्रेसच्या अडचणींत होणार वाढ; अनेक मंत्री, आमदारांचा लोकसभा लढवण्यास नकार | Navarashtra (नवराष्ट्र)


कर्नाटकात काँग्रेसच्या अडचणींत होणार वाढ; अनेक मंत्री, आमदारांचा लोकसभा लढवण्यास नकार

कर्नाटकातील काही मंत्री आणि आमदारांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखविल्याने काँग्रेसला ‘विजयी’ उमेदवार मिळणे कठीण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. काँग्रेसने सात जागांवर उमेदवार जाहीर करून 10 दिवस उलटले असले तरी उर्वरित 21 जागांवर उमेदवारांची यादी निश्चित झालेली नाही.

बंगळुरू : कर्नाटकातील काही मंत्री आणि आमदारांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखविल्याने काँग्रेसला ‘विजयी’ उमेदवार मिळणे कठीण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. काँग्रेसने सात जागांवर उमेदवार जाहीर करून 10 दिवस उलटले असले तरी उर्वरित 21 जागांवर उमेदवारांची यादी निश्चित झालेली नाही. काँग्रेसने 8 मार्च रोजी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत एकाही मंत्री किंवा आमदाराला उमेदवारी दिली नव्हती.

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक मतदारसंघात विजयी उमेदवार निवडण्यात अडचणी येत असल्याने काँग्रेस नेतृत्व काही मंत्री आणि आमदारांना निवडणूक लढवण्यासाठी वळविण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री जी. परमेश्वरा पक्षात सात ते आठ मंत्र्यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे परमेश्वरा यांनी नुकतेच सांगितले होते.






Source link