प्रभाग ३ मध्ये  शिवसेना (एकनाथ शिंदे) राजेगटाकडून पूनम सुनील भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
63
प्रभाग ३ मध्ये  शिवसेना (एकनाथ शिंदे) राजेगटाकडून पूनम सुनील भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल

फलटण (प्रतिनिधी): फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणांना वेग आला असून प्रभाग क्रमांक ३ मध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे) राजेगटाकडून पूनम सुनील भोसले यांनी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या घडामोडीनंतर स्थानिक राजकारणात नवा उत्साह आणि मोठी चर्चा रंगताना दिसत आहे.

पूनम भोसले या सुप्रसिद्ध युवा नेते, पत्रकार तसेच लोकप्रिय क्रिकेटपटू शक्ती उर्फ अशोक भोसले यांच्या चुलती असून, भोसले कुटुंबाचा सामाजिक आणि राजकीय वारसा त्यांच्या उमेदवारीत ठळकपणे दिसून येतो. गेल्या अनेक वर्षांपासून त्या रामराजे समर्थक म्हणून सक्रिय असून महिलांचे सक्षमीकरण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि परिसरातील मूलभूत सोयीसुविधांसाठी सातत्याने कार्यरत आहेत.

त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे प्रभागात त्यांनी भक्कम जनसंपर्क आणि जनविश्वास निर्माण केला आहे. शक्ती भोसले यांच्या प्रेरणादायी कार्यशैलीचा प्रभाव पूनम भोसले यांच्या कामकाजातही दिसून येत असल्याने युवकांमध्येही त्यांच्याबद्दल सकारात्मक भावना आहे.

शिवसेना (एकनाथ शिंदे) राजेगटाने पूनम भोसले यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविल्यानंतर विरोधकांच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रभाग ३ मध्ये महिला नेतृत्व उदयास येत असल्याने नागरिकांमध्येही उत्सुकतेचं वातावरण रंगत आहे.

“सामाजिक कार्यातून नेतृत्वाकडे” अशी ओळख निर्माण करणारी पूनम भोसले यांची उमेदवारी प्रभाग ३ मध्ये सकारात्मक बदलांची नांदी ठरू शकते, असा जनतेचा विश्वास आहे.