मलठण फाटा येथे पोलिसांची चकमक; रेकॉर्डवरील गुन्हेगार लखन भोसलेचा एन्काऊंटर

0
29
मलठण फाटा येथे पोलिसांची चकमक; रेकॉर्डवरील गुन्हेगार लखन भोसलेचा एन्काऊंटर

शिक्रापुर (पुणे):  मलठण फाटा परिसरात सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सायंकाळी सव्वा सहा वाजता केलेल्या कारवाईत रेकॉर्डवरील गुन्हेगार लखन उर्फ महेश पोपट भोसले (रा. वडगाव, जयराम स्वामी, ता. खटाव, जि. सातारा) जखमी अवस्थेत पकडला गेला.

भोसलेने पोलिसांना पाहताच तीक्ष्ण हत्याराने हल्ला चढविला. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी गोळीबार करत त्याला जखमी केले. त्यानंतर उपचारासाठी त्याला तातडीने सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले परतू भोसले मयत झाला  चकमकी  पोलिसही जखमी झाल्याची माहिती आहे.

भोसले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अशा 22 हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. दहीवडी, म्हसवड, वडगाव निंबाळकर, बारामती, इंदापूर, वडूज या ठिकाणच्या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.

त्याच्यावर यापूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. 2022 मध्ये पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला अटक केली होती. सध्या तो जामीनावर बाहेर होता. सातारा येथे दाखल असलेल्या एका गुन्ह्यात तो पोलिसांना हवा असल्याची माहिती मिळताच आज ही कारवाई करण्यात आली.