Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रपोलिसांची धडक कारवाई! वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील १३ आरोपींना ताम्हिणी घाटात अटक

पोलिसांची धडक कारवाई! वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील १३ आरोपींना ताम्हिणी घाटात अटक

पुणेःपुण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत, १३ फरार आरोपींना ताम्हिणी घाटात अटक केली आहे. रविवारी, १ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता दुचाकीवरून आलेल्या १४-१५ हल्लेखोरांनी आंदेकर यांच्यावर गोळीबार केला आणि कोयत्याने वार केले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच ते मृत घोषित झाले.

प्राथमिक तपासात, ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्ल्यावेळी आंदेकर यांची बहीण आणि मेहुणे घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यांनीच हल्लेखोरांना चिथावणी दिल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी यापूर्वीच त्यांना अटक केली होती.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तैनात केली होती. आज सायंकाळी, पोलिसांना ताम्हिणी घाटात हे आरोपी तळ ठोकून बसल्याची माहिती मिळाली, ज्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यांना अटक केली. या अटकेमुळे या हत्येच्या गूढ उकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments