टोळीवर पोलीस प्रशासनाची कारवाई: अकलुजमधील सहा गुन्हेगार ६ महिन्यांसाठी हद्दपार

0
34
टोळीवर पोलीस प्रशासनाची कारवाई: अकलुजमधील सहा गुन्हेगार ६ महिन्यांसाठी हद्दपार

सोलापूर: अकलुज (ता. माळशिरस) येथील समाजविघातक टोळीवर कडक कारवाई करत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ५५ अन्वये सहा गुन्हेगारांना सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीबाहेर ६ महिन्यांसाठी हद्दपार केलं आहे.

अकलुज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांनी सदर टोळीच्या कारवायांबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. टोळीतील सदस्यांनी अकलुज, सातारा शहर आणि श्रीरामपूर (जि. अहिल्यानगर) येथे गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

       टोळीवर दाखल गुन्ह्यांचा आढावा:

  • जबरदस्तीने दहशत निर्माण करणे
  • गंभीर स्वरूपाचे शरीरावरील हल्ले
  • विनयभंगाचे प्रकार
  • जनावरे नेऊन आर्थिक फसवणूक
  • मारहाणीचे आणि दुखापतीचे गुन्हे

ही टोळी संघटितपणे गुन्हे करत असून समाजात भीतीचे वातावरण तयार करत होती. त्यामुळे प्रशासनाने कठोर निर्णय घेत टोळीला जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

         हद्दपार केलेले टोळी प्रमुख व सदस्य:

  1. करण अभिमान उर्फ अभिमन्य पवार – टोळी प्रमुख, रा. जुना बाजार तळ, अकलुज
  2. बंटी उर्फ अभिषेक अभिमान उर्फ अभिमन्य पवार – टोळी सदस्य, रा. जुना बाजार तळ, अकलुज
  3. विठ्ठल उर्फ ओंकार सोमनाथ यादव – टोळी सदस्य, रा. अकलुज
  4. सागर अतुल पावसे – टोळी सदस्य, रा. अकलुज
  5. विजय शंकर नायडू – टोळी सदस्य, रा. संग्रामनगर
  6. आयान ख्वाजा तांबोळी – टोळी सदस्य, रा. संग्रामनगर

        पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन:

हद्दपार केलेले इसम जर जिल्ह्यात वावरताना आढळल्यास, नागरिकांनी तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे किंवा नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण यांना माहिती द्यावी. भविष्यातही दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या इसमांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांनी दिली.