
POCO Upcoming Smartphones: पोको एक्स ६ सीरीज लॉन्च होण्याची वाट पाहत असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. पोको इंडियाचे प्रमुख हिमांशू टंडन यांनी या सीरीजला टीज केले आहे. टंडन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा, सांता भेटवस्तू घेऊन येत आहे. ” पोको एक्स ६ सीरीजची लॉन्च तारीख आता खूप जवळ आली, असे या पोस्टवरून स्पष्ट होत आहे. नवीन सीरिजमध्ये कंपनीचे पोको एक्स ६ आणि पोको एस्क ६ प्रो हे दोन स्मार्टफोन्स लॉन्च करणार आहे. यापूर्वी या फोनचे फीचर्स लीक झाले होते.







