PM Modi : पंतप्रधान मोदी यांचा आज अयोध्या दौरा; २ अमृत भारत, ६ वंदे भारत एक्सप्रेससह ‘या’ प्रकल्पांचे लोकार्पण

0
27
PM Modi : पंतप्रधान मोदी यांचा आज अयोध्या दौरा; २ अमृत भारत, ६ वंदे भारत एक्सप्रेससह ‘या’ प्रकल्पांचे लोकार्पण


PM Modi Ayodhya Visit news update : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या येथे भेट देणार आहे. त्यांची ही भेट ऐतिहासिक ठरणार आहे. या एकदिवसिय दौऱ्यात मोदी विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत तर काही कामाचे लोकार्पण करणार आहेत. आज मोदी यांच्या हस्ते येथील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी करण्यात येणार आहे. या सोबत १५,७०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन ते करणार आहेत. पुनर्विकसित करण्यात आलेल्या अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानक लोकार्पण आणि देशातील विविध स्थानकांवरून चालणाऱ्या ६ वंदे भारत आणि २ अमृत भारत रेल्वेला देखील ते हिरवा झेंडा दाखवतील.



Source link