Thursday, August 20, 2026
Homeक्रीडाIndia vs South Africa : जडेजा फिट; दुसर्‍या कसोटीत खेळणार | पुढारी

India vs South Africa : जडेजा फिट; दुसर्‍या कसोटीत खेळणार | पुढारी

India vs South Africa : जडेजा फिट; दुसर्‍या कसोटीत खेळणार | पुढारी

[ad_1]








केपटाऊन, वृत्तसंस्था : भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (India vs South Africa ) पहिल्या कसोटीत डावाने पराभव झाला. यानंतर संघावर टीका होत आहे. पहिल्या कसोटीत भारताने फिरकीपटू म्हणून रविचंद्रन अश्विनला संधी दिली होती. रवींद्र जडेजाला दुखापत झाल्यामुळे तो पहिला सामना खेळू शकला नाही. आता रवींद्र जडेजा दुसर्‍या सामन्यासाठी फिट झाल्याचे सांगण्यात येत असून तो दुसर्‍या कसोटीत खेळण्याची शक्यता आहे.

पहिल्या कसोटीपूर्वी रवींद्र जडेजाला पाठीची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पहिल्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली. आता तो दुसर्‍या कसोटी सामन्यात प्लेईंग 11 मध्ये दिसण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव केला. आफ्रिकी तोफखान्यासमोर भारताची भंबेरी उडाली होती. (India vs South Africa )

इंडिया डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार रवींद्र जडेजा 3 जानेवारीपासून सुरू होणार्‍या दुसर्‍या कसोटीत खेळणार आहे. पहिल्या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी रवींद्र जडेजाने वॉर्म अप केले. त्यामुळे तो दुसर्‍या कसोटीत खेळण्याची आशा पल्लवीत झाली आहे. पीटीआने दिलेल्या माहितीनुसार जडेजाने 30 ते 40 मीटर स्प्रिंट मारली. याचबरोबर त्याने काही फिटनेस ड्रील देखील केले. तिसर्‍या दिवशीच्या सकाळच्या सत्रात त्याने सहभागदेखील घेतला होता.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments