बारामतीच्या विकास मॉडेलवर फलटणचा नवा अध्याय: आमदार सचिन पाटील अॅक्शन मोडवर

0
1
बारामतीच्या विकास मॉडेलवर फलटणचा नवा अध्याय: आमदार सचिन पाटील अॅक्शन मोडवर

बारामती :-  फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी नुकतीच बारामती शहरातील विविध विकासकामांची पाहणी केली. यामध्ये नाट्यगृहे, पादचारी मार्ग, पाण्याच्या टाकीचा विकास, तसेच अन्य मूलभूत सुविधा यांचा समावेश होता. त्यांच्या समवेत बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, तसेच माजी नगरसेवक सचिन अहिवळे हे प्रमुख उपस्थित होते.

नाट्यगृह व पादचारी मार्गांकडे विशेष लक्ष
बारामतीतील नाट्यगृहांच्या रचनेपासून सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनापर्यंतची सखोल माहिती आमदार पाटील यांनी घेतली. पादचारी मार्गांची सुविधा आणि सुरक्षिततेबाबतही त्यांनी बारकाईने पाहणी केली. पाण्याच्या टाकी विकास प्रकल्पाच्या व्यवस्थापनाचा अभ्यास करून त्यांनी या सुविधांचा फलटणमध्ये अनुकरण करण्याचा निर्धार केला.

फलटणच्या विकासासाठी नव्या योजना
या दौऱ्यानंतर बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले, “बारामतीच्या विकास मॉडेलचा अभ्यास करून आम्ही फलटण शहराला आधुनिक स्वरूप देण्यासाठी कटिबद्ध आहोत. नाट्यगृहे, पादचारी मार्ग आणि जलसंपत्ती व्यवस्थापनासारख्या सुविधा उभारून फलटणचे सुशोभन केले जाईल.”

नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची भूमिका
बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी फलटणसाठी सहकार्याची ग्वाही दिली. फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी सांगितले की, “बारामतीच्या विकास मॉडेलचा अभ्यास करून फलटणसाठी योजनाबद्ध प्रकल्प आखले जातील. या प्रकल्पांमुळे फलटणच्या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील.”

नागरिकांना आश्वासन
पाहणीनंतर आमदार सचिन पाटील यांनी फलटणच्या नागरिकांना आश्वासन दिले की, “बारामतीच्या धर्तीवर फलटणचा विकास करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. शहरातील सुविधा उंचावून फलटणला आधुनिक आणि सुशोभित बनवू.”

फलटणच्या विकासाचा हा अध्याय नागरिकांच्या सहभागामुळे यशस्वी होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.