
फलटणःफलटणचा आठवडा बाजार पूर्वीच्या ठिकाणी म्हणजे महावीर स्तंभ, उमाजी नाईक चौक ते गजानन चौक आणि उमाजी नाईक चौक ते डेक्कन चौक या परिसरात भरणार आहे. रविवार, २९ डिसेंबरपासून हा बाजार पूर्वीप्रमाणे सुरू होणार असल्याने शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
फलटण तालुका व्यापारी संघटनेने या निर्णयाबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांचे जाहीर आभार मानले आहेत.







