Friday, November 27, 2026
Homeफलटणफलटण तालुक्याचा बुलंद आवाज! विकास तरटे सरांना पंचायत समितीत स्वीकृत सदस्य म्हणून...

फलटण तालुक्याचा बुलंद आवाज! विकास तरटे सरांना पंचायत समितीत स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्याची मागणी

फलटण तालुक्याचा बुलंद आवाज! विकास तरटे सरांना पंचायत समितीत स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्याची मागणी

फलटण : फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर (तरटे वस्ती) येथील रहिवासी तथा राजेगटाचे निष्ठावंत कार्यकर्ते मा. विकास तरटे सर यांना फलटण पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळावी, अशी मागणी तालुक्यातील कार्यकर्ते व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

विकास तरटे सर यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदानही उल्लेखनीय असून त्यांनी एम.ए., एम.एड. ही पदवी संपादन केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी दहा विषयांत एम.ए. शिक्षण पूर्ण केले आहे.

पक्षसंघटनेप्रती असलेली निष्ठा, संघटनात्मक कार्यातील योगदान, सामाजिक कार्यातील सहभाग तसेच कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क या बाबींचा विचार करून त्यांच्या नावाला संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. पक्षासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल घेऊन पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मा. विकास तरटे सर यांच्या नावाचा सकारात्मक विचार करावा आणि त्यांना पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.

निष्ठेचा सन्मान व्हावा, सुशिक्षित कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्वाची संधी मिळावी आणि त्यांच्या माध्यमातून समाजसेवेला अधिक बळ मिळावे, हीच फलटण तालुक्यातील कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments