
रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा पाठपुरावा – मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून तालुक्याला दिलासा
फलटण : फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ग्रामीण विकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील १३ कि.मी. लांबीचे ५ अवगीकृत/योजनाबाह्य रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून मान्यता मिळाली आहे.
या निर्णयामुळे फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची गुणवत्ता व सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात उंचावणार असून, शेतकरी व ग्रामस्थांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे.
ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळालेले रस्ते :
- राजाळे गाव – फलटण आसु रस्ता (टेंगील वस्ती ते अनपट वस्ती) : २ कि.मी.
- राजाळे गाव अंतर्गत – आसु रोड ते पिंपरद रस्ता : ४ कि.मी.
- राजाळे जाधव वस्ती (शिवाजीनगर) ते सोनगाव रस्ता : १ कि.मी.
- आळजापुर ते पवार वस्ती – मसुगडे वस्ती ते रणदिवे वस्ती : ३.५० कि.मी.
- आळजापुर ते शिंदे वस्ती (धनगरवाडा) बिबी रस्ता : २.५० कि.मी.
स्थानिक नेत्यांचा पुढाकार
या पाठपुराव्यात आमदार सचिन पाटील, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले व विलासराव नलवडे यांनी विशेष भूमिका बजावली.
यापुढे फलटण तालुक्यातील रस्त्यांसाठी आणखी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.








