Thursday, September 17, 2026
Homeसाताराचार वर्षापासून फरारी सराईताला फलटण ग्रामीण पोलिसांकडून अटक

चार वर्षापासून फरारी सराईताला फलटण ग्रामीण पोलिसांकडून अटक

फलटण: दि १४फलटण ग्रामीण पोलीस स्थानकात २०२० साली दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये चार वर्षापासून फरार असलेला बारामती तालुक्यातील अक्षय उर्फ आकाश उर्फ भोऱ्या बापूराव जाधव राहणार मळद हा गेले चार वर्षापासून फरारी होता. सदरचा आरोपी हा बारामती शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याच्यावर झोपडपट्टी दादा कायद्यान्वये (mpda) सुद्धा कारवाई झालेली आहे. सदर आरोपीच्या पाठीमागे फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून होते तो काल त्याच्या घरी आला असता त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, तात्या कदम, नवनाथ दडस यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments