Tuesday, September 15, 2026
Homeसाताराफलटण : कुरवली तलावाजवळ दरोडा प्रकरण; आरोपीला अटक, साथीदार फरार

फलटण : कुरवली तलावाजवळ दरोडा प्रकरण; आरोपीला अटक, साथीदार फरार

फलटण: फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विस्तीर्ण क्षेत्रामध्ये लोकवस्ती कमी असलेल्या भागांमध्ये चोरी आणि लुटीच्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. अशीच एक गंभीर घटना 7 डिसेंबर रोजी घडली.

दोन महाविद्यालयीन तरुण-तरुणी कुरवली येथील तलावाजवळ मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. त्यांच्याकडे सोन्याच्या चैन आणि स्मार्टफोन असल्याचा फायदा घेत, दोन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तरुण-तरुणींच्या गळ्यातील दोन चैन आणि दोन स्मार्टफोन असा एकूण 3 लाख रुपयांचा ऐवज लुटला गेला.

या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि या गुन्ह्यातील आरोपी कार्तिक महेश चव्हाण (वय 25, रा. कुरवली खुर्द) याला अटक केली. त्याच्याकडून 25 हजार रुपये किमतीचा चोरीस गेलेला स्मार्टफोन हस्तगत करण्यात आला. मात्र, त्याचा साथीदार स्वप्निल महेश जाधव (रा. कुरवली, ता. फलटण) अद्याप फरारी आहे.

सदर आरोपींचा अभिलेख तपासला असता त्यांच्यावर यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे नोंद असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता आरोपींवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (MCOCA) कारवाई वाढवण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस हवालदार कदम, चतुरे, पोलीस नाईक जगदाळे, आणि दडस यांनी केली.

तपास अद्याप सुरू असून पुढील कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या नेतृत्वाखाली फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments