फलटण पोलिसांचा नागरिकांशी थेट संवाद – ऑनलाईन गुगल फॉर्मद्वारे अभिप्राय नोंदवण्याचे आवाहन

0
36
फलटण पोलिसांचा नागरिकांशी थेट संवाद – ऑनलाईन गुगल फॉर्मद्वारे अभिप्राय नोंदवण्याचे आवाहन

फलटण – “गणेशोत्सवात डीजेचा मोठा आवाज खरोखरच आवश्यक आहे का?” हा प्रश्न आता थेट नागरिकांपुढे पोलीस ठेवत आहेत. ध्वनी प्रदूषणाबाबत जनजागृतीसह मते जाणून घेण्यासाठी फलटण शहर पोलीस ठाण्याने एक अभिनव सर्वेक्षण सुरू केले आहे.

यासाठी खास ऑनलाईन गुगल फॉर्म तयार करण्यात आला असून, डीजेमुळे होणारे आरोग्य व मालमत्तेचे नुकसान, उत्सवासाठी त्याची आवश्यकता, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर करावयाची कारवाई अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर अभिप्राय मागवले जात आहेत. सर्वेक्षण अर्ज भरण्याची अंतिम तारीख – १६ ऑगस्ट २०२५ आहे.

नागरिकांचे नाव, पत्ता किंवा मोबाईल नंबर अशी कोणतीही वैयक्तिक माहिती या फॉर्ममध्ये विचारली जाणार नसल्याने, न घाबरता प्रामाणिक मत नोंदवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वांनी या लिंकवर क्लिक करून मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व रहिवाशांनी https://forms.gle/EYM3n7Q1EEMbv TpQ8 या लिंकवर जाऊन या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.