फलटण नगरपरिषद निवडणूक रंगतदार! दोन्ही गटांची अधिकृत उमेदवार यादी जाहीर; प्रत्येक प्रभागातील लढती स्पष्ट

0
146
फलटण नगरपरिषद निवडणूक रंगतदार! दोन्ही गटांची अधिकृत उमेदवार यादी जाहीर; प्रत्येक प्रभागातील लढती स्पष्ट

फलटण प्रतिनिधी : शहरातील राजकीय वातावरण तापवणाऱ्या फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत अखेर दोन्ही प्रमुख गटांनी आपल्या अधिकृत उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर खासदार गट (महायुती) आणि राजे गटाने (शिवसेना/आघाडी) प्रभागनिहाय उमेदवारांची नावे जाहीर केली असून आता प्रत्येक प्रभागातील थेट सामना स्पष्ट झाला आहे.

खासदार गटाने प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस चिन्हांवर उमेदवार उभे केले आहेत, तर राजे गट शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर रिंगणात उतरला आहे. काही प्रभागांत ‘आघाडी’ तसेच स्वतंत्र उमेदवारांची नोंदही आहे.

उमेदवारी अर्जांची छाननी आज (दि. १८) होत असून, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत चित्रात काही बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, जाहीर झालेल्या याद्यांमुळे शहरातील निवडणूक वातावरण चांगलेच तापले आहे आणि दोन्ही गटांनी विजयाचा दावा केला आहे.

खाली दोन्ही गटांची प्रभागनिहाय अधिकृत उमेदवार यादी 👇

प्रभागनिहाय उमेदवार यादी

१ अ

  • राजे गट : आवळे लक्ष्मी प्रमोद
  • महायुती : सौ. अस्मिता भीमराव लोंढे / सौ. नर्मदा किसन पवार

१ ब

  • राजे गट : पवार सुमन रमेश
  • महायुती : सोमाशेठ गंगाराम जाधव / देविदास किसन पवार

२ अ

  • राजे गट : रणदिवे आरती जयकुमार
  • महायुती : मीना जीवन काकडे (राष्ट्रवादी)

२ ब

  • राजे गट : अहिवळे अनिकेत राहुल
  • महायुती : सौ. सुपर्णा सनी अहिवळे (राष्ट्रवादी)

३ अ

  • राजे गट : भोसले पूनम सुनील
  • महायुती : सचिन रमेश अहिवळे (राष्ट्रवादी)

३ ब

  • राजे गट : ननावरे सुषमा हेमंत
  • महायुती : सौ. सुलक्षणा जितेंद्र सरगर

४ अ

  • राजे गट : जाधव रुपाली सुरज
  • महायुती : सौ. हेमलता चंद्रकांत नाईक (राष्ट्रवादी)

४ ब

  • राजे गट : पप्पू शेख
  • महायुती : राहुल जगन्नाथ निंबाळकर

५ अ

  • राजे गट : व्हटकर सुरेखा श्रीकांत
  • महायुती : सौ. कांचन दत्तराज व्हटकर

५ ब

  • राजे गट : पाटील विजय हरिभाऊ
  • महायुती : रोहित राजेंद्र नागटिळे

६ अ

  • राजे गट : कुंभार दीपक अशोक
  • महायुती : किरण देवदास राऊत

६ ब

  • राजे गट : जगदाळे अमिता सदाशिव
  • महायुती : मंगलादेवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर

७ अ

  • राजे गट : कर्णे श्रीदेवी गणेश
  • महायुती : सौ. स्वाती राजेंद्र भोसले

७ ब

  • राजे गट : गुंजवटे पांडुरंग मानसिंगराव
  • महायुती : अशोक जयवंत जाधव

८ अ

  • राजे गट : तेली विशाल उदय
  • महायुती : फिरोज शहनवाज आत्तार

८ ब

  • राजे गट : खानविलकर सुवर्णा अमरसिंह
  • महायुती : कु. सिद्धाली अनुप शहा

९ अ

  • राजे गट : मदने कविता श्रीराम (आघाडी)
  • महायुती : रजिया मेहबूब मेटकरी (राष्ट्रवादी)

९ ब

  • राजे गट : पवार पंकज चंद्रकांत (आघाडी)
  • महायुती : अमोल प्रकाश भोईटे (राष्ट्रवादी)

१० अ

  • राजे गट : तारळकर श्वेता किशोर
  • महायुती : सौ. रेहाना अमीर मोमीन

१० ब

  • राजे गट : पवार विशाल पांडुरंग (आघाडी)
  • महायुती : अमित अशोक भोईटे

११ अ

  • राजे गट : चोरमले कृष्णात मल्हारी (दादासाहेब)
  • महायुती : संदीप दौलतराव चोरमले

११ ब

  • राजे गट : निकम प्रियांका युवराज
  • महायुती : सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले

१२ अ

  • राजे गट : काकडे विकास वसंतराव
  • महायुती : अरुण हरिभाऊ खरात

१२ ब

  • राजे गट : शहा स्मिता संगम
  • महायुती : सौ. हेमंत फुले

१३ अ

  • राजे गट : बागवान सानिया फिरोज (आघाडी)
  • महायुती : मोहिनी मंगेश हेंद्रे

१३ ब

  • राजे गट : काकडे निर्मला शशिकांत (आघाडी)
  • महायुती : रुपाली अमोल सस्ते

१३ क

  • राजे गट : सूर्यवंशी (बेडके) सचिन सुभाषराव (आघाडी)
  • महायुती : राहुल अशोक निंबाळकर (राष्ट्रवादी)